महाराष्ट्र

सह्याद्रीचे रौद्र कडे आणि कोकणातला समुद्र

भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या सीमा ह्या कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या पाच राज्यांशी जोडल्या आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिमेला दूर पर्यंत पसरलेली अरबीसमुद्राची किनारपट्टी लाभली आहे.

महाराष्ट्राचा शब्दशः अर्थ ‘महान राज्य’ किंवा ‘महान देश’ असा होतो. महाराष्ट्राला अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृती लाभलेली आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक नागरी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, शिर्डी आणि कोल्हापूर हे महाराष्ट्रातील मुख्य शहरं म्हणून ओळखली जातात.

महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच प्रकारचे पर्यटन ठिकाणे आहेत. यात सुंदर समुद्रकिनारे, अभयारण्य, थंड हवेची ठिकाणे, लेणी, नैसर्गिक धबधबे, दुर्गम किल्ले, विविधरंगी उत्सव, प्राचीन धार्मिक ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे या सर्वच ठिकणी पर्यटक मोठ्या संखेने भेट देतात.

पर्यटन हा महाराष्ट्रातील एक सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे. ज्यामुळे बऱ्याच परदेशी चलनात वाढ होऊन राज्यातील रोजगार निर्मिती होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओढा वाढवण्यासाठी काही प्रचार मोहीम आणि योजनांसह महाराष्ट्र पर्यटन शिबिरं घेण्यात येतात.

महाराष्ट्रमधील निवास व्यवस्था

सामंत बीच रिसॉर्ट

वेंगुर्ल्यामधील एक स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा देवबाग बॅकवॉटर जवळ असणाऱ्या भोगवे गावातल्या कोळवेल वाडीमध्ये आहे आपल्याला राहण्याचा सुंदर अनुभव देणारे 'सामंत बीच रिसॉर्ट'

3000 - 3500 पासून पुढे

अधिक माहिती