ओडिसी व्हॉयेज इंडिया - कोकण दर्शन सहल

तीन दिवसांची कोकण दर्शन सहल


दररोजच्या धकधकीच्या जीवनाचा कंटाळा आला आहे का? निसर्गाच्या सानिध्यात ... मोकळा श्वास घ्यावासा वाटतोय ? स्वच्छ, निर्जन, प्रदूषण विरहित समुद्रात डुंबायचे आहे? चुलिवरचे जेवण / मासे खायचे का??रायफल शूटिंग, ट्रेकिंग, शेततळ्यात डुंबयाच आहे? रत्नागिरी सेंद्रिय हापूसच्या बागेतच राहून तिथली मज्जा घ्यावीशी वाटतेय???

दररोजच्या धकधकीच्या जीवनाचा कंटाळा आला आहे का? निसर्गाच्या सानिध्यात ... मोकळा श्वास घ्यावासा वाटतोय ? स्वच्छ, निर्जन, प्रदूषण विरहित समुद्रात डुंबायचे आहे?

चुलिवरचे जेवण / मासे खायचे का?? रायफल शूटिंग, ट्रेकिंग, शेततळ्यात डुंबयाच आहे? रत्नागिरी सेंद्रिय हापूसच्या बागेतच राहून तिथली मज्जा घ्यावीशी वाटतेय??? सुर्यास्तचा विहंगम दृश्य बघावेसे वाटतेय का? स्कुबा डायविंग करायचे आहे का? डॉल्फिन चक्कर तर हमखास !!

इतक्या सर्व गोष्टी अगदी रास्त दारात मिळाल्या तर???

विश्वास बसत नाहीये ना?

चला तर मग आमच्याबरोबर, येताय ना कोकणात.....?

बँच १ : १,२,३ डिसेंबर २०१७ / बँच २: २३,२४,२५ डिसेंबर २०१७

दिवस पहिला 1 डिसेंबर 2017 - दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत अॅग्रो टुरिझममध्ये आगमन, दुपारचे जेवण थोडा थोडीशी विश्रांती, (वामकुक्षी,) दुपारी साडेतीन वाजता चहा किंवा कॉफी, चार वाजता जैतापुर खाडीमध्ये बोटिंग, सायंकाळी पाच वाजता आंबोळगड येथे प्रयाण, आंबोळगड समुद्रकिनारा, आंबोळगड येथून सूर्यास्त दर्शन, सायंकाळी 7 वाजता अॅग्रो टुरिझममध्ये पुन्हा आगमन, सायंकाळी सात ते नऊ इनडोअर फन गेम्स रात्री 9 वाजता जेवण.

दिवस दुसरा 2 डिसेंबर 2017 - सकाळी लवकर मचाण येथून सूर्यदर्शन, पक्षीनिरीक्षण, नऊ वाजता नाश्ता, सकाळी दहा ते सायंकाळपर्यंत ट्रेकिंग ऍक्टिव्हिटीज होतील, यामध्ये स्विमिंग, झिप लाईन, क्लाईंबिंग, रॅपलिंग अशा एक्टिविटी होतील स्विमिंग करिता योग्य असे कपडे आवश्यक आहेत. सायंकाळी 7 ते 9 कॅम्प फायर, रात्री 9 वाजता जेवण.

दिवस तिसरा 3 डिसेंबर 2017 - सकाळी सहा वाजता चहा घेऊन विजयदुर्ग कडे प्रयाण, विजयदुर्ग येथे सकाळचा नाष्टा होईल, विजयदुर्ग पाहून झाल्यावर तारकरली कडे प्रयाण, तारकर्ली येथे दुपारचे जेवण, वॉटर स्पोर्ट्स डॉल्फिन दर्शन स्कुबा डायविंग अशा ॲक्टिव्हिटी होतील सायंकाळी चार किंवा पाच वाजता पुन्हा पुण्याकडे प्रयाण