हरिहरेश्वर

महादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद


रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारे हरिहरेश्वर येथे असणारे महादेवाचे मंदीर भाविकांचे विशेष श्रद्धास्थान  हे म्हसाळ्यापासून दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे तीन फाटे फुटतात. या फाट्यापासून साधारण १६ कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.
Harihareshwar Temple

एका बाजूला समुद्र, दुसऱया बाजूला मंदिर, मंदिराच्या मागच्या बाजूने असणाऱया डोंगरातून खाली समुद्राच्या दिशेने उतरणारा रस्ता, आणि एकीकडे बाणकोट खाडी...

श्रीवर्धनप्रमाणेच हरिहरेश्वर देखील निसर्गरम्य आहे. नैसर्गिक मऊ पांढरी वाळू, सभोवताली असणारी सुरूची वने हे इथले वैशिष्ट्य. येथील महादेवाचे मंदिर पेशव्यांचे श्रद्धास्थान होते. त्यामुळे रमाबाईं आणि त्यांच्या बरोबरीन पेशव्यांचे घराणे येथे भेट देत असल्याच्या नोंदी आहेत.

येथील महादेव मंदिरामागे टेकडीवरून तुम्हाला खाली उतरता येते. या टेकडीच्या मधोमध खाली पायऱयांनी उतरत जाणारा रस्ता तुम्हाला थेट समुद्रकिनारी आणतो. मात्र येथे पाण्यात जाण्यापुर्वी ग्रामस्थांकडून भरती ओहोटीच्या तसेच संभाव्य धोक्याच्या सुचना नक्कीच घ्या. येथील समुद्र हा तसा शांत असला तरी येथे पाण्यात उतरणे धोकादायक आहे. त्याचप्रमाणे जवळच बाणकोट खाडी असल्याने ओहोटी पाणी खेचणारी असते.

हरिहरेश्वरला कसं जाल?

जवळचा विमानतळ : मुंबई १७९ कि.मी., पुणे १५९ कि.मी.

जवळील रेल्वे स्टेशन : मुंबई - गोवा महामार्गावरील माणगाव. अंतर ४८ कि.मी.

महामार्ग : पुणे - मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव - म्हसाळा - हरिहरेश्वर १७१ कि.मी.
पुणे - लोणावळा - खोपोली - पाली - कोलाड - इंदापूर - माणगाव - म्हसाळा - हरिहरेश्वर २२१ कि.मी.
मुंबई - वाशी - पनवेल - खालापूर - खोपोली - पाली - कोलाड - माणगाव - म्हसाळा - हरिहरेश्वर २०० कि.मी.
मुंबई - वाशी - पनवेल - पळस्पा - पेण - नागोठणे - कोलाड - माणगाव - म्हसाळा - हरिहरेश्वर १९० कि.मी.