कोकणात फिरायचा सीझन झाला सुरू

दि : | भटकंती बातम्या | महाभटकंती |

Konkan tourism season has started

पावसाळा संपलाय, समुद्राचं उधाण शांत झालंय, दसरा आणि दिवाळी साजरी झालीय. आणि याच बरोबर आपल्याला हिवाळ्याची चाहूल ही लागलीय.

याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ एवढाच की, कोकणातल्या भटकंतीचा सीझन सुरू झालाय. हो, कोकणात आता फिरायला जायला हरकत नाही. म्हणजे ती तशीही कधी नसते. पण पावसात कोकण फिरणं म्हणजे जरा अवघड प्रकरण आहे असं दोन वर्षापुर्वी भर पावसात गणपतीपुळे फिरून आल्यावर आमचं मत झालंय आणि जरा अनुभवाचा सल्ला म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आम्ही तर या भटकंतीची सुरूवात पण केलीय. तेव्हा तुम्हीपण सुरूवात करायला हरकत नाही.

तेव्हा आता कोकण भटकंती सुरू करा. समुद्र किनारे बघा, प्राचीन देवालये बघा. निसर्ग सौदर्याचा आस्वाद घ्या. दणकून मासे खा. कोकणी माणसाच्या आदरतिथ्याचा नमुना बघा. कोकण फिरा... !!!