गावची जत्रा : परंपरा आणि आनंदपर्व

दि : | जत्रा | महाभटकंती |

सुगीचे दिवस आलेत आणि गावागावांना लागले आहेत जत्रेचे वेध. वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या जत्रा (jatra) असतात. पीरबाबांचा उरूस, म्हातोबा देवाचा उरूस, गावच्या कुलदेवतेची जत्रा ...

गावात असणाऱ्या प्रथा, परंपरा कटाक्षाने इथे पाळल्या जातात. मान-मरातब आणि मानकरी यांचे एक वेगळं जग इथे दिसतं. एकीकडे हे सर्व चालू असतानाच दुसरीकडे भरली जाणारी जत्रा, तेथे असणारी खेळणी, वेगवेगळे स्टॉल्स, खाण्यापिण्याची चंगळ आणि विक्रीस ठेवलेल्या वेगवेगळ्या वस्तू …

अर्थात पुण्यासारख्या शहरात असे उरूस किंवा जत्रा (jatra) भरतात का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण, फार-फार पुर्वी पुण्यामध्ये असे उरूस आम्ही देखील अतुभवले आहेत. कोथरूड येथील म्हातोबा देवाचा उरूस आणि पौड फाट्याजवळील पीर बाबाचा उरूस आम्ही अनुभवला आहे.

आणि याच धाग्याला पुढे नेत आम्ही जत्रा (jatra) हा नवीन विभाग आमच्या महाभटकंतीमध्ये समाविष्ट करतो आहोत. अर्थात, हे आव्हान आम्हा एकट्याला पेलवणं शक्य नाही. कारण, गावा-गावामध्ये असणाऱ्या जत्रा आम्हाला शोधून शोधून काढणं सर्वथा शक्य नाही. तेव्हा आमच्या वाचकांनी, साईट व्हीजीटर्सनी आम्हाला याबाबतीत मदत करावी अशी अपेक्षा आम्ही करतो. आपल्या गावामध्ये जर जत्रा भरत असेल तर त्याची माहिती आपण आम्हाला कळवली तर ती आमच्या साईटवर प्रसिद्ध करायला आम्हाला नक्कीच आवडेल. सोबत एखादा फोटो असेल तर दुग्धशर्करा…

आपल्या गावातील जत्रेची माहिती आपण आम्हाला admin@mahabhatkanti.com किंवा mahabhatkanti@gmail.com या मेल आयडी ला पाठवू शकता किंवा 7020430024 या नंबर ला व्हॉट्सअॅप करू शकता. आपल्या रिस्पॉंसची वाट बघतो आहोत.