आमच्याबद्दल


बाहेर पडा आणि भटकंतीचा आनंद घ्या !

महाभटकंतीच्या साईटवर आपले स्वागत आहे. एका बाजूला अजस्त्र सह्याद्री तर दुसरीकडे रायगडपासून सिंधूदुर्गपर्यंत पसरलेला अथांग सागर आणि नैसर्गिक सृष्टीसौंदर्यामुळे महाराष्ट्र पर्यटकांना कायमच खुणवत असतो. निसर्गाने नटलेल्या महाराष्ट्राचे वैभव म्हणजे सोन्यासारखी वाळू असणारे समुद्रकिनारे, उंचचउंच आणि रौद्र धबधबे, प्राचिन देवस्थाने, हिरवेगार डोंगर – दऱया, उत्तुंग गडकोट. अशा या समृद्ध असणाऱ्या महाराष्ट्रात फिरणं आणि आपली सुट्टी एंजॉय करणं यासारखं दुसरं सुख नाही.

भटकणं हा आमचा स्थायी भाव आहे. आम्ही जरी पुण्याचे असलो तरी पुण्याबाहेरची ठिकाणं माहीत करून घेणं आणि तिथे भटकंती करणं हे आमचं एक व्यसन बनलंय. आपल्या सभोवताली फिरण्यासारखी इतकी ठिकाणं आहेत की त्यापैकी बरीचशी आपल्याला माहीतही नसतात. आणि कोठेही फिरताना येणारे अनपेक्षित अनुभव आणि अमर्याद मजा आपल्याला अशी भटकंती पुन्हा पुन्हा करण्यास प्रेरीत करते.

एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचे असेल तर तिथे कसं जायचं, कशा पद्धतीने प्रवास करायचा, तिथे बघण्यासारखं काय काय असेल. तिथे खाण्या-पिण्याची, गरज पडल्यास राहण्याची सोय असेल का, आपण रात्रभर प्लॅन करत जागत असतो. महाभटकंती तुम्हाला आवश्यक असणारी ही सर्व माहिती आपल्या साईटवर ठेवणार आहे. तुमची भटकंती विनासायास आणि विनाअडथळा पार पडावी, अगदी शेवटच्या क्षणाच्या ठरली तरी….!!!

आणि हो, केवळ आम्हीच नाही तर तुम्ही देखील तुमचे भटकंतीचे अनुभव आमच्या बरोबर शेअर करावेत असं आम्हाला वाटतं. कारण, तुमचा भटकंतीचा अनुभव इतरांना कुठेतरी त्यांचं प्लॅनींग करताना मदत करू शकेल….!!!! आणि तुमच्या अनुभवावरून आम्ही आमचीही माहिती अजुन व्यवस्थितपणे मांडू शकू असं आम्हाला वाटतं….!!!

ही केवळ सुरूवात आहे. बाकी महाराष्ट्रपण आम्ही असाच फिरणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या ठिकाणांची माहिती आम्हाला कळवाल अशी अपेक्षा! आमच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा आपलं लिखाण आमच्या बरोबर शेअर करायचं असेल, साईटबद्दल काही सुचना, सुधारणा सुचवायच्या असतील किंवा आमच्या साईटवर आपली जाहिरात करण्यासंदर्भात चौकशी करायची असेल तर आम्हाला mahabhatkanti@gmail.com या ईमेलवर संपर्क करा अथवा 9403924711 किंवा 7387800624 या नंबरवर आमच्याशी बोलू शकता.